Ad will apear here
Next
काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या प्रमुखपदी पुरंदरे
नियुक्ती पत्र स्वीकारताना चैतन्य पुरंदर.पुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे संघटक सचिव चैतन्य पुरंदरे यांची नुकतीच पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आलेली असून, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी काँग्रेस भवन येथे याबाबतचे नियुक्तीपत्र पुरंदरे यांना प्रदान केले. या वेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चैतन्य पुरंदरेसोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध राहणार असल्याचे पुरंदरे यांनी या वेळी सांगितले; तसेच पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अधिकृत फेसबुक पेज व व्हॉट्सअॅप ग्रुप लवकरच तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZZOBJ
Similar Posts
‘ख्रिसमस संध्या’ ठरली आनंदाची पर्वणी पुणे : दरवर्षी साजरा होणारा ‘ख्रिसमस संध्या’ हा उपक्रम यंदा बालगोपाळांबरोबरच त्यांच्या पालकांसाठीही आनंदाची पर्वणी देणारा ठरला. समानतेचा संदेश देताना तिरंगी फुगे आकाशात सोडून स्वावलंबन, समुपदेशन, रोजगारविषयक प्रशिक्षण यांसह विविध योजना मोफत उपलब्ध करून देण्याचा शुभारंभही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला
विश्वशांती यज्ञाद्वारे वैष्णवांचे विठ्ठलाला साकडे पुणे : सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदुंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या हजारो वैष्णवांनी ‘बा विठ्ठला... बळीराजाचे अकाली मरण टळू दे... सर्वसामान्यांना आता महागाईतून मुक्ती दे... जगामध्ये समाजातील सर्वधर्मसमभावाचा एकोपा कायम राहू दे’ अशी आळवणी केली. पुणे मुक्कामी
शिवजयंती मिरवणुकीत तुळशीच्या रोपांचे वाटप पुणे : काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील मिरवणूकात सहभागी शिवभक्तांचे स्वागत तुळशीची रोपे भेट देऊन करण्यात आले.
काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त ‘ख्रिसमस संध्या’ पुणे : ‘अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त २५ डिसेंबर २०१८ रोजी सर्वधर्मियांसमवेत ख्रिसमस संध्याचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती माजी उपमहापौर, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language